hindu janajagruti samiti demands to follow court order tuljabhavani ornaments case Saam Digital
महाराष्ट्र

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

तुळजाभवानी देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणातील दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करावी लागेल अशी भूमिका आज (शुक्रवार) हिंदु जनजागृती समीतीने पत्रकार परिषदेतून मांडली. दरम्यान वेळ प्रसंगी मंत्रालयासमोर आम्हांला उपोषणाला बसावे लागले तर आम्ही ते देखील करु असेही समितीने स्पष्ट केले. (Maharashtra News)

हिंदू जनजागृती समीतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक सुनिल घनवट म्हणाले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सन 1991 ते 2009 या कालावधीतील सोने चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाच्या छञपती संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिले आहेत.

हे आदेश 10 दिवसांपूर्वीच दिलेत. तरीही अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये जवळपास 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये 16 जणांचा समावेश आहे.

घनवट पुढं बाेलताना म्हणाले यामध्ये 9 लिलावदार, 6 तहसीलदार, 1 व्यवस्थापक, धार्मिक अधिकारी आहेत. या दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावे अन्यथा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करावी लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान वेळ प्रसंगी मंत्रालयासमोर आम्हांला उपोषणाला बसावे लागले तर आम्ही ते देखील करु. तसेच तपासणी दरम्यान जे दोषी आढळतील त्या सर्वांची वैयक्तिक संपत्ती जप्त करुन संबधित झालेल्या भ्रष्टाचार वसुली करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT