Sushil kedia news  Saam Tv
महाराष्ट्र

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

MNS Raj Thakrey : मीरा रोडवरील मनसैनिकांच्या आक्रमकतेवर बोट ठेवत सुशील केडिया यांच्या पोस्टने महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद उफाळून आला आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या धमक्यांनंतर केडिया यांनी पोलिसांकडे सुरक्षा मागितली असून या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Alisha Khedekar

सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद शिगेला पोहचला आहे. गल्लीपासून सुरु झालेल्या वादाने राजकारणातही शिरकाव केला आहे. महायुती सरकारने त्रिभाषा सूत्र अमलात आणल्यानंतर ठाकरे बंधूनी एकत्र येत त्याच्या विरोधात आवाज उठवला. मीरा रोडवरील एका दुकानदाराने मराठीमध्ये बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केल्याच्या व्हिडीओनंतर व्यवसायिक सुशील केडीया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन राज ठाकरेंना टॅग केलं आहे."मराठीत बोलणार नाही काय करायचं ते बोल" असे म्हटले आहे. त्यानंतर आता पुन्हा सुशील केडीया यांनी एक्स वर ट्विट करत त्यांना पोलीस सुरक्षा हवी असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा वाद तापलेला असताना आता केडियानॉमिक्सचे मालक सुशील केडिया यांनी केलेल्या एक्स पोस्टने वादाची ठिणगी पडली आहे. सुशील केडिया यांनी एक्स पोस्ट करत म्हटले आहे,"मुंबईत ३० वर्ष राहूनही मला मराठी बोलता येत नाही आणि तुमच्या घोर गैरवर्तनामुळे मी प्रतिज्ञा केली आहे की, जो पर्यंत तुमच्या लोकांना मराठी लोकांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोल? मीरा रोडवरील एका दुकानदाराने मराठीमध्ये बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केल्याच्या व्हिडीओनंतर केडिया यांनी हे पोस्ट केले आहे.

प्रसिद्ध व्यवसायिक केडिया यांची सोशल मीडियावर पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्यांच्या त्या पोस्टनंतर पुन्हा केडिया यांनी पोस्ट करत मनसैनिक त्यांना धमक्या देत असून त्यांच्यापासून वाचण्यासाठी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणी काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

केडिया यांच्या सोशल मीडिया पोस्ट नंतर मनसैनिक मनोज चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणाले, "राजकारणात ज्या गोष्टी सुरू आहेत त्यामध्ये मराठी विषय,राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्यावर बोलल की फेमस होत. भाषेवर कोणी काही बोलत असेल तर त्यांच्या कानफडात बसणारच महाराष्ट्रात मराठीत ज्याला कुणाला येत नसेल त्यांना आम्ही मराठी भाषेत शिकवू. मराठी शिकायचेच नाही काय करायचं असेल ते करून घ्या यापुढे कानाखाली जाळच काढल्या जाईल. सुशील केडिया कोण आहे? उद्याचे पाच तारखेचा झाल्यानंतर निश्चितपणे त्याला काय करायचं ते करू. त्यांनी त्याचे ॲक्शन केले आता आमचे रिएक्शन करण्याची वेळ आली आहे." असे मनसैनिक मनोज चव्हाण म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT