जालना : कर्नाटकातील हिजाब (Karnatak Hijab Controversy) वादाचे पडसाद आता जालन्यात देखील उमटत आहेत. जालन्यात (Jalna)आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाब समर्थक मुस्लीम नुमाइंदा खवातीनच्या वतीने धरणे आंदोलनास करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी सहभाग नोंदवला.
हे देखील पाहा :
'पहले हिजाब, फिर किताब' अशा जोरदार घोषणा ही हिजाब समर्थक महिलांकडून दिल्या जात आहेत. यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करून कर्नाटक (Karnataka) सरकारचा ही निषेध व्यक्त केला. कर्नाटक सरकार संविधानाने (Constitution) दिलेल्या मुस्लिम (Muslim) महिलांच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप ही हिजाब समर्थक महिलांनी केला. या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लावण्यात आला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.