Chhatrapati Sambhajinagar News : saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुरख्याचा वाद पेटला; तरुणांचा पीइएस कॉलेजमध्ये गोंधळ

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील PIS कॉलेजमध्ये परीक्षेविरोधात बुरखा काढण्याची चर्चा सुरू झाली. काही विद्यार्थी आणि MIM कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये गोंधळ घातला. पोलिसांनी तक्रार नोंदवून मध्यस्थी केली; तरीही परिसरात तणाव पसरला आहे.

Alisha Khedekar

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा हिजाबवरून वाद निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील पीइएस कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला बुरखा घालण्यास मनाई केली. त्यावरून काही तरुणांनी कॉलेजमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचं समोर आले. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील पीइएस शिकणाऱ्या एका तरुणीने परीक्षेला जाताना आपल्याला बुरखा काढण्याचे सांगण्यात आल्याचे सांगितले. त्यावरून काही तरुणांनी सोमवारी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे म्हणत टोळक्याने प्राचार्याच्या कार्यालयात प्रवेश केला. आणि गोंधळ घातला म्हणून प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी गुन्हा दाखल केला. मात्र परीक्षेला जात असताना कोणत्याही तरुणीला इजाब किंवा बुरखा काढण्यास सांगितले नाही तसा प्रकारे झाला नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

एकीकडे पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आज पुन्हा काही एमआयएमचे कार्यकर्ते महाविद्यालयात आले. महाविद्यालयात येऊन त्यांनी याबाबत प्राचार्यांना जाब विचारला, यावेळी प्राचार्य आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शेवटी पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला.

परीक्षेला जात असताना शिक्षकांनी नियम सांगितले आणि त्याची तक्रार प्राचार्याकडे केली. त्यानंतर कॉलेजमध्ये येऊन टोळक्यांनी गोंधळ घातला मात्र हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. आता हा वाद तात्पुरता मिटला असला तरी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये बुरख्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT