Maratha Protest HC  Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Protest HC: मोठी बातमी! मराठा आंदोलनाविरोधातील याचिका न्यायालयाने स्वीकारली, आता पुढे काय?

Maratha Protest Mumbai HC News: मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.

Sandeep Gawade

Maratha Protest HC News

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे. अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंच्या मोर्च्याने मुंबईकडे कुच केली असून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी खंडपीठांसमोर केली होती. न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने वैयक्तिक कारणास्तव या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, अन्यथा येत्या २६ जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. लाखो मराठा आंदोलकांसह जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे. अशातच जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून या याचिकेवर आज दुपारीच मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणाची मागणी करून मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत आहेत. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मनोज जरांगेंवर फौजदारी कारवाई करावी, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी देखील अशीच याचिका दाखल होती, मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT