radhakrishna vikhe patil, ujani dam, indapur, baramati saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam News : विखे - पाटलांच्या भुमिकेने उजनीचं पाणी पेटणार ?

यापुर्वी उजनी पाण्याच्यावरुन शेतक-यांनी लढा उभा केला हाेता.

भारत नागणे

Ujani Dam News : उजनी‌ धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला एक थेंबही जावू देणार नाही असे आश्वासन पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. विखे - पाटील यांच्या भुमिकेने पुन्हा एकदा उजनीच्या पाण्याचा वाद पेटणार की काय अशी चर्चा हाेऊ लागली आहे. (Radhakrishna Vikhe Patil Latest Marathi News)

मंगळवेढा येथे आवताडे साखर कारखान्या गळीत हंगाम कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी उजनीच्या पाण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांचा हक्क आहे. त्यांच्या हक्काचं पाणी इंदापूर बारामतीला कोणत्याही परिस्थितीत जावू देणार नाही असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून (ujani dam) इंदापूर बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी पाच टीएमसी उपसा सिंचन योजना मंजूर केली होती. या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांचा तीव्र विराेध आहे. शेतक-यांच्या विरोधा नंतर ही भरणे यांनी योजनेसाठी मोठा निधीही मंजूर केला होता.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता इंदापूर आणि बारामतीला (baramati) उजनीतून‌ एक थेंबही पाणी जावू देणार नसल्याचे पालकमंत्र्यी विखे पाटील यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उजनीचे पाणी पेटल्याची चर्चा हाेऊ लागली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT