Hemant godase  saam tv
महाराष्ट्र

Hemant Godse : हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत? नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता

maharashtra political news : नाशिक लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत आहे. गोडसे हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिजित सोनावणे

Hemant Godse News :

राज्यात महायुतीने काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काही मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची देखील तयारी केली आहे. मात्र, महायुतीचा काही जागांचा तिढा कायम आहे. त्यात नाशिकच्या जागेचाही समावेश आहे. नाशिक लोकसभा जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. या लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत आहे. गोडसे हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमधील तिढा कायम आहे. या मतदारसंघातील उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे आज मंगळवारी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, नाशिकचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी गोडसे हे नाशिकच्या जागेबाबतचा १० पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

हेमंत गोडसे यांच्या १० पानी अहवालात काय लिहिलंय?

महायुतीकडून नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष संघटन बांधणीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे यांच्या बंडाचा फटका नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बसू शकतो.

नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला असलेला विरोध पाहता निवडून येण्यातही अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच भुजबळांच्या उमेदवारी महायुतीची १ जागा कमी होईल. अशा अनेक मुद्द्यांच्या सामावेश अहवालात असल्याची माहिती हाती आली आहे. गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांकडे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी , महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास हेमंत गोडसे हे बंडाच्या तयारीत आहे. तसेच छगन भुजबळांना उमेदवारी दिल्यास ते अपक्ष लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT