Maharashtra Lok Sabha Election : ओव्हर कॉन्फिडन्स नको; श्रीकांत शिंदे यांच्याकडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना

Lok Sabha Election 2024 : गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली मध्येशिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital

अभिजित देशमुख

Maharashtra Lok Sabha Election

गेली दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने विकास काम केलीत. उमेदवार कुणीही आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार , ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये. गेल्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली मध्येशिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत . आज डोंबिवली मधील ज्ञानेश्वर ब्राह्मण सभा हॉलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे या बैठकांना उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात सूचना करण्यात आल्या. लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, केलेली विकास कामे लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, मतदारांपर्यंत कसं प्रकारे पोहोचायचे, निवडणूक यंत्रणा कशाप्रकारे राबवायची, या सगळ्या गोष्टींबाबत सूचना करण्यात आल्या.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील आठवड्यात पॅनल पद्धतीने बैठका होणार आहेत या बैठकांमध्ये माजी नगरसेवक शाखाप्रमुख शहरप्रमुख देखील असणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. श्रीकांत शिंदे विरोधात अद्याप विरोधकांना उमेदवार मिळाला नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेली दहा वर्ष खासदार म्हणून या मतदारसंघात लोकांच्या सहकार्याने विश्वासाने काम केलं. लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत .ही विकास कामे समोर ठेवून निवडणुकीची तयारी करतोय.

Maharashtra Lok Sabha Election
Akola Lok Sabha: अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने केला उमेदवार जाहीर, अभय पाटील यांना दिलं तिकीट

विरोधकांना कोणी ना कोणीतरी उमेदवार द्यावा लागेल मात्र जो कोण उमेदवार येईल त्याबद्दल विचार न करता आपण केलेले कामे लोकांपर्यंत कसे जातील यासाठी आमच्या या बैठका सुरू आहेत उमेदवार कोणी आला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नये 2019 मध्ये साडेतीन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो त्यापेक्षा जास्त मताधिक्य यंदा घेऊन निवडून येण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे सांगितले .

Maharashtra Lok Sabha Election
Akola Lok Sabha: वंचितचा इशारा, निवडणूक आयोगाचे आदेश, अन् भाजपनं घेतली माघार; नेमकं काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com