लातूर: गेल्या ४ दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाचा मोठा कहर पाहायला मिळत आहे. रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव इथं काही व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. या व्यक्तींना सकाळी NDRF च्या टीमने हेलिकॉप्टरमधून लिफ्ट करत सुखरूप वाचलं असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. (Helicopters rescued three people trapped in the floodwaters in latur)
हे देखील पहा -
दुसरीकडे निलंगा तालुक्यातील मुगाव मसळगा गावचे शेतकरी गोविंद अंबादास जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला असलेले शिवाजी भीमराव कुदरे हे शेतात मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडले होते निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांनी टीमसह दाखल होऊन त्यास सकाळी सुखरूप वाचवलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं असून अनेक जिल्ह्यांत पावसाचा कहर पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.