Fresh snowfall covers the scenic valleys of Kashmir as tourists enjoy winter magic amid disrupted daily life. Saam Tv
महाराष्ट्र

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; स्वर्ग पांढऱ्या चादरीखाली, पर्यटनाला बहर

Paradise Under Snow: सध्या काश्मीर आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. भारताचा स्वर्ग अक्षरशा बर्फाच्या चादरीखाली गेलाय. पर्यटक याचा आनंद लुटतायत...तर काहींचे मात्र हाल सुरू आहेत.

Saam Tv

बर्फाच्छादित डोंगर, हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहणारे उत्साही पर्यटक आणि बर्फात खेळणारी मुले. हे दृश्य स्नप्नाहून कमी नाहीये. काश्मीर खोऱ्याने पांढरी चादर पांघरली आहे! गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर जोरदार हिमवृष्टी झालीय, सर्वत्र बर्फाची चादर पसरलीय. पर्यटनासाठीच्या या "गोल्डन डेज" मध्ये हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिकही सुखावले आहेत.

जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशात शुक्रवारी बर्फवृष्टी झालीय. गुलमर्गमध्ये दोन फुटांपेक्षा जास्त तर सोनमर्गमध्ये सहा इंच बर्फ साचला. खोऱ्यातील बडगाम, बारामुल्ला, कुपवाडा, शोपियां, पुलवामा आणि बांदीपुरा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये हलकी बर्फवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.

श्रीनगरने तर जणू चांदीचा मुकुट परिधान केला आहे. जिथे दोन फुटांच्या बर्फाखाली धरणी विसावली आहे. बडगाम, बारामुल्ला आणि कुपवाड्याच्या डोंगरदऱ्यात निसर्गाचा रुपेरी अभिषेक सुरू असतानाच, श्रीनगरनेही या हंगामातील पहिल्या हिमस्पर्शाचा आनंद लुटला. अनंतनागपासून कुलगामपर्यंत सर्वत्र पसरलेले हे स्वर्गीय अनुपम सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतंय...

मात्र बर्फवृष्टीमुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय. खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून २०पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आलेत. जम्मू-श्रीनगर महामार्गासह अनेक मार्ग बंद करण्यात आले, श्रीनगरची विमानसेवा विस्कळीत झाली, उचांवरील प्रदेशांमध्ये शाळा बंद ठेवल्यात. तर तिकडे कटारा येथील त्रिकुटा डोंगरांवर या हंगामात पहिल्यांदाच बर्फ पडल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निसर्ग पर्यटकांवर खुश असला तरी यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सूख-समृद्धी येण्याचा योग; 'या' तीन राशींची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Car-Truck Accident: SUV कार आणि ट्रकचा भीषण अपघात; धडकेत कारचा चक्काचूर,६ जणांचा जागीच मृत्यू

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात खळबळ, अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

Congress: काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ७५ नेत्यांनी सोडली 'पंजा'ची साथ, राजकारणात खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष कधी ठरणार? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT