अनंत चतुर्दशी संपल्यानंतर कोकणवासीयांची मुंबई-पुण्याकडे परतीची लगबग
सावंतवाडीसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी
तिकीटांच्या कमतरतेमुळे दुप्पट-तिप्पट दराने तिकीट खरेदी
रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या आणि अतिरिक्त व्यवस्था सुरू
राज्यात यंदाचा गणेशोत्सव थाटामाटात पार पडला. २७ ऑगस्ट रोजी गणराया घरोघरी विराजमान झाले. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर काल अंतचतुर्दशीला ११ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाले. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले कोकणवासीय आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान सावंतवाडी स्थानकावर कोकवासीयांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
यंदा कोकणात पावसाचे सरी आणि निसर्गसौंदर्यामुळे उत्सवाचा आनंद अधिक खुलला. दरवर्षी कोकणातल्या प्रत्येक वाड्यांमध्ये गावागावांत भव्य मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाविकांच्या गर्दीने उत्सवाचे वातावरण असते. मात्र अनंत चतुर्दशी पार पडताच आता हे सर्व कोकणवासीय पुन्हा मुंबई-पुण्याकडे परतण्यास सुरुवात झाली आहे.
विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके प्रवाशांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेली आहेत. सावंतवाडी स्थानकावर तर शेकडो प्रवाशांची तुफान गर्दी दिसून आली. सकाळपासूनच प्रवाशांची रेलचेल सुरू असून तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अनेक प्रवाशांना गाडीचे नियमित तिकीट मिळाले नाही. परिणामी प्रवाशांना एजंटकडून किंवा इतर मार्गाने दुप्पट-तिप्पट दराने तिकीट घ्यावे लागले आहेत. काही ठिकाणी रिक्षा, खासगी बसचा पर्याय निवडला जात आहे. काही गाड्यांमध्ये आरक्षित आसनांची संख्या अपुरी ठरल्याने प्रवाशांना डब्यात उभे राहून किंवा प्लॅटफॉर्मवर गाड्यांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या वतीने काही विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तरीदेखील प्रवाशांच्या संख्येमुळे स्टेशन परिसर गजबजलेला दिसत आहे.
या संपूर्ण प्रवासात चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसून येत आहे. कारण, त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबत घालवलेले काही दिवस हीच त्यांच्यासाठी खरी ऊर्जा आहे. आता ते पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी परतणार असले तरी मनामनात ते आधीच पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.