Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील कोकण हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. अनेक पर्यटक खास कोकणाला भेट देतात.
नैसर्गित सौंदर्य, पांढराशुभ्र समुद्रकिनारा, नारळाच्या बागा, हिरवागार जंगल यासाठी कोकण प्रसिद्ध आहे.
कोकणात पहिला काचेचा पूल तयार करण्यात आला आहे.
तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग येथे पहिला काचेचा पूल तयार करण्यात आला आहे.
सिधुंदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे.
पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्री नितेश राणे हे उपस्थित होते.
कोकणात फिरायला येणारे पर्यटक हमखास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला भेट देतात. मालवणमधील समुद्राकिनारे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.