Manasvi Choudhary
आषाढ महिन्यात दीप अमावस्येला विशेष महत्व आहे.
श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस आधी दीप अमावस्या साजरी केली जाते.
दीप अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हटले जाते.
दीप अमावस्येला भगवान विष्णूची पूजा करण्याला महत्व आहे.
आज सर्वत्र दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे.
या दिवशी सकाळी घरातील दिवे, समया, निरांजने, मोठे दिवे स्वच्छ करावे.
पाटाभोवती रांगोळी किंवा फुलाने सजवून दिवे मांडून त्याची पूजा करा.
अनेक ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्याची पूजा केली जाते.
लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याने त्यांना देखील आज ओवाळले जाते.