Manasvi Choudhary
श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी साजरी करण्याची पद्धत आहे.
गटारी म्हटलं की मस्त मासांहरी पदार्थावर ताव मारण्याचा दिवस.
गटारी अमावस्या २४ जुलै रोजी आहे मात्र या दिवशी गुरूवार असल्याने बुधवारी आज अनेकजण गटारी साजरी करणार आहेत.
मात्र तुम्हाला गटारी म्हणजे काय माहितीये का?
गटारी अमावस्या आपण ज्याला बोलतो त्याचे मूळ नाव गतहारी अमावस्या असे आहे.
आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हटंले जाते. या दिवशी दीप पूजन करण्याची पद्धत आहे.
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावस्येला दिवे लावून देवांची पूजा केली जाते.