Manasvi Choudhary
हॉटेलमध्ये गेल्यानंतर चिकन 65 स्टाटर म्हणून ऑर्डर केले जातात.
कुरकुरीत फ्राय केले चिकन खायला चवदार लागते.
चिकन 65 घरी बनवण्याची सोपी रेसिपी आहे.
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करा.
चिकनमध्ये आलं- लसूण पेस्ट, धना पावडर, हळद, दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचा ठेचा, आणि मीठ घालून मिक्स करा.
मिश्रण एकत्रित मिक्स करून एक ते दोन तास मॅरिनेट करा.
मॅरिनेट झाल्यानंतर त्यात तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये चिकनचे तुकडे एक एक करून सोडा.
कुरकुरीत चिकन होईपर्यत हे चिकन तळून घ्या. दुसऱ्या बाजूला गॅसवर जिरा आणि मसाल्याच्या फोडणीमध्ये हे मिश्रण घाला.
अशाप्रकारे चिकन 65 सर्व्हसाठी तयार होईल.