महाराष्ट्र

मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. बहुतांशी सर्वच तालुक्यांत ही परिस्थिती आहे. राहुरी तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला. बंधारे फुटले. शेतांत पाणी शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली. काल (मंगळवारी) सकाळी आठ वाजता मुळा धरणातून विसर्ग वाढवून आठ हजार ६८० क्यूसेकने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडले. मुळा नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बारागाव नांदूर येथे हावरीच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे बराच वेळ राहुरीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. घोरपडवाडी, मल्हारवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. घोरपडवाडी येथे वाघाची नळी बंधारा फुटला. आसपासच्या शेतांत पाणी साचले.Heavy rains cut off communication in many villages abn79

कांदा, सोयाबीन, कपाशी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी बारागाव नांदूर परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

केंदळ येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने बराच वेळ राहुरीचा संपर्क तुटला. केंदळ, मानोरी, मांजरी, आरडगाव, तांदूळवाडी, पाथरे भागात ओढ्या-नाल्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे. Heavy rains cut off communication in many villages abn79

राहुरी तालुक्यात पाच ऑक्टोबर अखेर सरासरी ४४४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी आज अखेर ६१२.२ मिलिमीटर (सरासरीच्या १३७.८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

महसूल मंडळ निहाय कालचा पाऊस (मिलिमीटर) असा : राहुरी (६.५), सात्रळ (३३.३), ताहाराबाद (५३), देवळाली प्रवरा (४२.८), टाकळीमियाँ (२७.५), ब्राह्मणी (१७.३), वांबोरी (३१.३).

रात्रीच्या पावसाने कपाशीच्या पिकात गुडघाभर पाणी साचले. ट्रॅक्टर कर्जाचा ५२ हजारांचा हप्ता भरायचा आहे. काढणीला आलेली कपाशी हातातून गेली आहे. निसर्ग कोपलाय. सुलतानी-आस्मानी संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.

- विशाल तारडे, नुकसानग्रस्त शेतकरी, केंदळ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

SCROLL FOR NEXT