आ. नीलेश लंकेंच्या घरात शरद पवार घामाघूम!

हंगे ः आ. लंके यांच्या घरात प्रवेश करताना ज्येष्ठ नेते शरद पवार.
हंगे ः आ. लंके यांच्या घरात प्रवेश करताना ज्येष्ठ नेते शरद पवार.

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वात कमी कालावधीत पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी मोठे नाव कमावले आहे. पारनेरच्या जनतेच्या पसंतीसही ते उतरले आहेत. त्यांची साधी राहणीचे मतदारांसह नेत्यांनाही अप्रूप वाटते. अनेक नेत्यांनी त्यांच्या घरी भेट दिली आहे. आज माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक भेट दिली.

राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन समारंभासाठी शरद पवार नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी लंके यांच्या घरी भेट दिली. लंके यांच्या घरी अल्पोपहारही घेतला.Sharad Pawar visited MLA Nilesh Lankes house abn 79

हंगे ः आ. लंके यांच्या घरात प्रवेश करताना ज्येष्ठ नेते शरद पवार.
साखरेऐवजी कारखान्यांनी आता इथेनॉल तयार करावं - मंत्री गडकरी

घरात प्रवेश करताना पवार यांनी आमदार लंके यांचा आधार घेतला होता. आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव व आई शकुंतला, पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य राणी लंके यांनी त्यांचे स्वागत केले. लंके यांचे पारनेर तालुक्यातील हंगे येथे निवासस्थान आहे. पवार यांच्यासमवेत पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार उपस्थित होते.

अतिशय साध्या पध्दतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा डंका थेट देशभर पसरला होता. त्याची पक्षाने दखल घेतली आहे. पवार कुटुंबातील बहुतांशी सदस्य लंके यांच्या घरी येऊन गेले आहेत. आज पवार यांच्यासह इतर मंत्रीही आले.Sharad Pawar visited MLA Nilesh Lankes house abn 79

घरात नेत्यांची, कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने बसायलाही जागा अपुरी पडली. घरात एसी नव्हे तर फॅन होता. त्याची हवाही जोराची नसल्याने पवार घामाघूम झाले होते. इतर नेत्यांचीही वेगळी अवस्था नव्हती. पवार यांनी आस्थेवाईकपणे लंके यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com