साखरेऐवजी कारखान्यांनी आता इथेनॉल तयार करावं - मंत्री गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरीसाम टीव्ही

अहमदनगर ः साखर कारखानदारींना आता नवीन प्रयोग केले पाहिजेत. साखर निर्मितीऐवजी इथेनॉल निर्मिती केली पाहिजे. शेतकऱ्यांनीही आता पेट्रोलच्या गाडी न बसता इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीत बसावे. तीच वाहने वापरावीत, असे झाल्यास शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नगर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.मंत्री गडकरी यांनी चाकण-श्रीगोंदा, कर्जत-जामखेड आणि बीड तसेच कोपरगाव-सावळी विहीर १५० रस्ता मंजूर केला. औरंगाबाद-पुणे रस्ता तीन पदरी करण्याचा विचार आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राला मोठे गिफ्ट दिले.Sugar mills should produce ethanol - Gadkari

नितीन गडकरी
शरद पवार-नितीन गडकरी नगरमध्ये येणार एकाच व्यासपीठावर

सुरत-हैदराबाद-चेन्नई ग्रिनफिल्ड हा राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जात आहे. तब्बल १८० किलोमीटरचा हा मार्ग नगरमध्ये आहे. त्यासाठी ८ हजार कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे नगर देशातील मुख्य शहरांसोबत जोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय चांगला

शिर्डीत स्मार्टसीटी उभारण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय चांगला आहे. महाराष्ट्र सर्वच बाबतीत आघाडीवर असला पाहिजे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने मदत केली. त्यामुळे हे काम पुढे जात आहे, असेही मंत्री गडकरी म्हणाले. Sugar mills should produce ethanol - Gadkari

पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे काम

पश्चिम महाराष्ट्र हा देशात सर्वच बाबतीत आघाडीवर राहिला आहे. दूध आणि साखर उत्पादनात येथील सहकाराने मोठी भूमिका बजावली. त्यामुळेच तेथे समृद्धी नांदते आहे. शेतकऱ्यांनी आता उसाच्या मधल्या पट्ट्यात तेल बियांचे उत्पादन घेतले पाहिजे.

(Edited By - Ashok Nimbalkar)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com