Maharashtra Rain Alert  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Rain : परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपले, पुण्यात अनेक शाळांना सुट्टी, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Heavy Rain Maharashtra: परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली असून रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरड कोसळणे, नद्या तुडुंब भरणे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

Namdeo Kumbhar

  • परतीच्या पावसामुळे पुणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस.

  • पुण्यातील अनेक शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आली.

  • पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळून वाहतुकीत अडथळा.

  • महाड व पोलादपूर परिसरात सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ.

  • हवामान विभागाने राज्यासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला.

heavy rainfall in maharashtra pune schools closed today : परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. ग्रामीण भागातील पिके पाणीखाली गेली आहेत. तर शहरी भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसान हजेरी लावली आहे. पुण्यामध्येही रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज हवामान विभागाकडून मुंबई, पुण्यासह राज्यभरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पुण्यातील लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मॉन्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला असून दोन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. आज राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

पुण्यात शाळांना सुट्टी -

पुणे शहरासह उपनगरात रविवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावत पुणेकरांची धांदल उडवली. रात्री उशिरापर्यंत अधून-मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. चिंचवड परिसरात सर्वाधिक ४० मिमी पावसाची नोंद झाली. लोहगांव, हडपसर, हवेली, शिवाजीनगर, मगरपट्टा आणि कोथरूड परिसरात पावसाच्या मध्यम सरींनी रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. स्थानिक शाळाने निर्णय घेऊन मुलांना सुट्टी दिली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे काही भागात शाळांना सुट्टी जाहीर केली.

पोलादपुर महाबळेश्वर रस्त्यावर दरड

पोलादपुर महाबळेश्वर रस्त्यावर रात्री उशीरा दरड कोसळली. आंबेनळी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कापडे गाव हद्दीत हि दरड कोसळली असून यामुळे काहीकाळ रस्ता बंद ठेवण्यात आला होता. प्रशासनाने तात्काळ JCB आणि मनुष्य बळाचा वापर करीत रस्त्यावरील दगड माती हटवून मार्ग मोकळा केला. योग्य ती काळजी घेऊन पोलादपुर महाबळेश्वर रस्त्याचा वापर करण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ

रविवारी सायंकाळी दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपले. याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपुरला बसला. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने महाड शहर चांभारखिंड परिसरात, मुंबई गोवा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर महाबळेश्वर परीसरा झालेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून पोलादपुरमधील सावित्री नदी लगतच्या परिसरात रस्त्यावर रात्री उशिरा पर्यंत पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहून

Google Gemini Photos: रेट्रो लूक करायचाय? पण जमतच नाही; हे 10 Prompt वापरा अन् ट्रेडिंगमध्ये राहा

Kumbha Rashi: पैशांचे संकट दूर होणार का? जाणून घ्या कुंभ राशीचे सोमवारचे भविष्य

Dashavatar Collection: दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' हाऊसफुल, रविवारी सर्व रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT