Raigad Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

Raigad Rain Update News : कोकण भागातील रायगडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Vishal Gangurde

रायगड : जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळदार पावसामुळे काही गावांच संपर्क तुटला आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे महाड-रायगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसामुळे जोड नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे.

महाकाय झाड कोसळले

रायगडमधील म्हाप्रळ पंढरपूर मार्गावर महाकाय झाड कोसळले आहे. महाड जवळच्या चोचिंदे गावाजवळची ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे वडाचे झाड रस्त्यावर पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

खाडी पट्टयाचा संपर्क तुटला

महाडच्या खाडी पट्टयाचा संपर्क तुटला आहे. महाड म्हाप्रळ रस्त्यावर तेलंगे गावाजवळ रस्त्यावरून पाणी वाहत आहे. म्हाप्रळ पंढरपूर रस्त्याच्या कामाचा खाडी पट्टयातील रहिवाशांना फटका बसला आहे. तेलंगे येथील पुलाला तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला आहे. बांधकाम ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

Trekking Forts : लोहगड-कलावंतीण दुर्गच नव्हे, महाराष्ट्रातील 'हे' ५ किल्लेही देतात भन्नाट ट्रेकिंग अनुभव

Maharashtra News Live Update: ठाण्यात मध्यरात्री जीवघेण्या स्टंटचा थरार!

Back Pain: रोज पाठ दुखते, बाम लावून दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या 'ही' ७ कारणं असू शकतात जबाबदार

Tuesday Horoscope: आज या राशींच्या आयुष्यात घडणार महत्त्वाचे बदल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT