Buldhana Rain nalganga River F Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Rain: बुलढाण्यात पावसाचे थैमान! मलकापूर शहराला नळगंगेच्या पुराचा वेढा; अनेक घरे पाण्याखाली

Buldhana Rain nalganga River Flood News: पुराचा नदीकाठच्या शेकडो गावांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील दाताळा गाव नदीकाठी असल्याने असंख्य घरे नदीत वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा

Buldhana Heavy Rainfall News: बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. आज रात्रभर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून या पावसाने जिल्ह्यातील सर्वात मोठे नळगंगा धरण ओव्हरफूल झाले आहे. धरणाचे 11 दरवाजे 2 फुटाने उघडले असून पाण्याचा प्रचंड विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नळगंगा नदीला महापूर आला आहे. या पुराचा नदीकाठच्या शेकडो गावांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील दाताळा गाव नदीकाठी असल्याने असंख्य घरे नदीत वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

रात्रभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून या पावसाने जिल्ह्यातील सर्वात मोठे नळगंगा धरण ओव्हरफू झाले आहे. सध्या धरणाचे 11 दरवाजे 2 फुटाने उघडले असून पाण्याचा प्रचंड विसर्ग केला जात आहे त्यामुळे नळगंगा नदीला महापूर आला आहे. नदीकाठच्या शेकडो गावांना या पुराचा फटका बसला. दाताळा गाव नदीकाठी असल्याने असंख्य घरे नदीत वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ग्रामस्थांनी बुऱ्हाणपूर ते जालना महामार्ग रोखला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे. मात्र ग्रामस्थ आक्रमक झाल्याने प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. आमची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. तसेच नदीला पूर असल्याने शेकडो गावे बाधित झाले असल्याची माहिती आहे. दाताळा ते बोदवड रस्ता बंद झाला आहे गावांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे शेगाव तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे.

मोरवा नदीला पूर आल्याने पातूरडा ते टाकली पंच या दोन गावांचा एकमेकाशी संपर्क तुटला आहे. या परिसरातील शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मका, सोयाबीन, कापूस व तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकाऊन घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

मलकापूर शहराला नळगंगा नदीच्या पुराने वेढा घातला असल्याने शहरातील भीमनगर, जावई नगर, पारपेठ, विकास नगर, ज्ञानेश्वर नगर , व इतर परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेकांची घरे पाण्यात गेली असल्याने घरातील साहित्य नुकसान व् धान्यांची नासाडी झाली आहे. या नदीपुराचा फटका सर्वात जास्त्त भीम नगरला बसला असून अनेकाची घरे पाण्यात गेली आहेत. नदीपुराचे पाणी वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT