Maharashtra Pre Monsoon Rain Alert  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Weather : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, अतिवृष्टीचा इशारा, २० जिल्ह्यांना अलर्ट

Heavy Rainfall Alert in Maharashtra : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे, मुंबईसह २० जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. पुढील ४८ तासात वादळी पावसाची शक्यता.

Namdeo Kumbhar

Maharashtra Pre Monsoon Rains : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, पुण्यासह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात हवामान कसं असेल, त्याबाबत जाणून घेऊयात..

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, लातूर, नांदेड, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात वादळी पावसामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाचा इशारा ?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं हाहाकार माजवला आहे. पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिकच्या घाटमाथ्यावर, पुणे , अहमदनगर, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT