Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain Update: राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; कोकणात ऑरेंज अलर्ट

नारळी पौर्णिमेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रत्नागिरी: गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) पुन्हा सुरूवात केली आहे. कोकणात मागील १२ तासापासून पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. रत्नागिरी-चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नारळी पौर्णिमेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गटार साफ न केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसत आहे. पावसामुळे चिपळूणमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Rain Update)

मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा (Rain) राज्यात जोर वाढणार आहे. मुंबईत ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणात आज सकाळपासून पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. हवामान विभागाने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली होती. ८ ते १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? मग 'हा' फेसपॅक नक्कीच ट्राय करुन बघा

Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT