sindhudurg, sindhudurg rain update, kudal, nirmala river saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Rain : निर्मला नदीचा पुर ओसरला; दळणवळण सुरु

तब्बल सात तासानंतर माणगाव खोऱ्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कुडाळ-माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस (rain) झाला. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने (nirmala river) धोकापातळी ओलांडली हाेती. आंबेरी पुलावर गुडघाभर पाणी आले हाेते. त्यामुळे पुढील 27 गांवाचा शहराशी संपर्क तुटला हाेता. कुडाळ (kudal) तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असून आंबेरी पुलावरून पाणी जात असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक (traffic) ठप्प झाली हाेती. सध्या माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीचा पुर ओसरला. त्यामुळे येथील दळणवळण सुरु झालेली आहे. (Sindhudurg Rain Update)

गेल्या चार तासापासून आंबेरी पुलावर पाणी हाेते. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पुर आला हाेता. परिणामी 27 गांवाचा कुडाळ तालुक्याशी संपर्क तुटलेला हाेता. दोन्ही बाजूची वाहनं अडकून पडली हाेती.

तब्बल सात तासानंतर आंबेरी पुलावरील पाणी कमी झाले. रात्री साडे बारा वाजेच्या दरम्यान पुराचा जोर ओसरला. सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या एसटी बस पुरामुळे अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांना मोठा मनस्ताप झाला हाेता.

या पुरामुळे माणगाव खोऱ्यातील 27 गावे होती संपर्काच्या बाहेर हाेती. मात्र आता पुराचा जोर ओसरला असून परिस्थिती पुर्व पदावर आली आहे. त्यामुळे येथील दळणवण सुरु झालेली आहे. नागरिकांनी पावसाचा जाेर लक्षात घेऊन घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

SCROLL FOR NEXT