buldhana, chikhali, rain, farm
buldhana, chikhali, rain, farm saam tv
महाराष्ट्र

Buldhana : ढगफुटीसदृश पाऊस; मिसाळवाडी धरण भरलं, शेतीपिके पाण्याखाली

संजय जाधव

बुलढाणा : चिखली तालुक्यातील मिसाळवाडी-पिंपळवाडी, शेळगाव आटोळ परिसरात ढगफुटीसदृश धुव्वाधार पाऊस (rain) झाला. या पावसाने मिसाळवाडी नदीला महापूर आला असून, मिसाळवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहात आहे. या पावसामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. (Buldhana Rain Update)

अनेक शेतात पाणी साचल्याने पिके वाया गेली आहेत. धुव्वाधार सुरु झालेल्या या पावसाने मिसाळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून, नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

त्यामुळे मिसाळवाडी गावाचा संपर्क तुटला होता. तर अनेक शेतकरी शेतात-रानात अडकून पडले होते. या पावसाने जीवितहानी झाली नसली तरी, शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन व इतर पिकांची नासाडी झाली असून, शेतकर्यां चे अतोनात नुकसान झाले आहे..

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्पोर्टी लूक अन् जबरदस्त फीचरसह Mahindra XUV 3XO लाँच; किंमत दहा लाखांपेक्षा कमी

Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Amravati News : पोलिसांची नजर चुकवत आरोपी फरार; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी होता दाखल

Today's Marathi News Live : दादर पूर्वमधून १.१४ कोटींची रोकड जप्त

Divorce: नवऱ्याने तोंडाला केक लावल्याने नवरी भडकली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट

SCROLL FOR NEXT