Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : जालना, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक भागात पूरजन्य स्थिती, घरांमध्ये शिरले पाणी

Jalna Buldhana News : पुराचे पाणी थेट गावामध्ये शिरल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वडगाव सरहद्द गावामध्ये नदीचे पाणी शिरल्याने गावातील किराणा दुकानात आणि नागरिकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरल आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे/ संजय जाधव 

जालना/बुलढाणा : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतातील पिके देखील कोमेजू लागली होती. यामुळे बळीराजाच्या नजर आकाशाकडे लागलेल्या होता. साधारण दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले असून जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. परिणामी अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. 

मंठा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
जालन्यातील मंठा तालुक्यातील वडगाव सरहद्द गावासह परिसरामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे वडगाव सरहद्द परिसरामधून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी थेट गावामध्ये शिरल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वडगाव सरहद्द गावामध्ये नदीचे पाणी शिरल्याने गावातील किराणा दुकानात आणि नागरिकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरल आहे. तर या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिके देखील पाण्याखाली गेले आहे.

लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रासह परिसरात ही मुसळधार पाऊस झाला. मात्र यावेळी पुन्हा एकदा पांग्रा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारे पाणी थेट पांग्रा डोळे गावात शिरले असून गावातील काही घरात पाणी शिरल्याने घरांतील साहित्याचे मत नुकसान झाले आहे. असेच शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होते. 

ग्रामस्थांची प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार 

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा यासंदर्भात तक्रार दिल्या. मात्र प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरत असल्याने घराचे नुकसान होते. त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT