Jalgaon News Saam Tv
महाराष्ट्र

Dengue News: जळगावमध्ये डेंग्यूचा उद्रेक! जिल्ह्यात १९३ संशयित रुग्ण, ८१ पॉझिटिव्ह आढळले

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत ११९३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८१ पॉझिटिव्ह आढळले असून, मनपाकडून डास निर्मूलनासाठी फवारणी मोहीम सुरु आहे.

Alisha Khedekar

  • जळगाव जिल्ह्यात तब्बल ११९३ डेंग्यू संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.

  • ८१ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

  • डास निर्मूलनासाठी मनपाकडून मोठ्या प्रमाणात फवारणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

  • ९४ पथके नियुक्त करून जिल्हाभरात तपासणी व नियंत्रणाची कामे सुरु करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले असून, जिल्ह्यासह शहरामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आतापर्यंत जिल्हाभरात तब्बल ११९३ डेंग्यू संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ८१ रुग्णांचे नमुने तपासणीअंती पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे केवळ जळगाव शहरातीलच ८७ रुग्ण संशयित आढळल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.

शहरात डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी जळगाव महापालिकेने सध्या मोठ्या प्रमाणावर फवारणी मोहीम हाती घेतली आहे. नाले, गटारे, तसेच पाण्याची साचलेली ठिकाणे यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जात असून, घरगुती पातळीवरही नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर डेंग्यूसह डायरिया, गॅस्ट्रो, लेप्टो यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात एकूण ९४ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १५ तालुक्यांमध्ये कार्यरत पथके, ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबत दोन जिल्हास्तरीय विशेष पथके अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला ठराविक भागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, संशयित रुग्णांचा शोध, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवणे, तसेच परिसरात डास निर्मूलनासाठी उपाययोजना राबवणे अशी कामे केली जात आहेत.

जळगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हवामानातील बदल, शहरीकरणामुळे निर्माण होणारा कचऱ्याचा प्रश्न, तसेच साचलेले पाणी हे मुख्य कारणे मानली जातात. पावसाळ्याच्या काळात आरोग्य विभागाला डेंग्यूच्या साथीशी झुंज द्यावी लागते. यंदाही त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की डान्स बार? रात्रभर महिलांना नाचवलं, लहान मुलांसमोर अश्लिल हावभाव; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक वस्ती पाण्याखाली

Omraje Nimbalkar: ठाकरेंचा ढाण्या वाघ, धाराशिवकरांचा लाडका, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल जाणून घ्या

71st National Film Awards: राष्ट्रपतींच्या हस्ते आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; 'या' कलाकारांचा होणार सन्मान

पुण्यात फडणवीसांचा शरद पवारांना धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेला? ५ स्टार हॉटेलमध्ये भेट अन्..

SCROLL FOR NEXT