Siddhi Hande
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर नेहमीच आपल्या बेधडक स्वभाव आणि कामामुळे चर्चेत असतात.
ओमराजे निंबाळकर यांनी निंबाळकर घराण्याचा राजकारणाचा वारसा पुढे नेत आहेत.
ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहे.
धाराशीवमध्ये सध्या पुरपरिस्थिती आहे. या पुराच्या पाण्यात हजारो नागरिक अडकले आहेत.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्वतः ओमराजे निंबाळकर पुढे सरसावले आहे. त्यांनी पुराच्या पाण्यात उतरुन नागरिकांना सुखरुप बाहेर काढले आहे.
ओमराजे निंबाळकर यांचा जन्म १७ जुलै १९८२ रोजी झाला.पवनराजे आणि आनंदीदेवी निंबाळकर हे त्यांचे आईवडील आहेत.
ओमराजे निंबाळकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण धाराशीवमध्ये घेतले. त्यानंतर कॉलेजसाठी ते लातूरला गेले.
यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ओमराजे पुण्यात गेले होते.
परंतु त्यांच्या वडिलांचा म्हणजेच पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ते पुन्हा धाराशीवला परतले.
ओमराजे यांना राजकारणात रस नव्हता. परंतु वडिलांचा खून झाल्यानंतर त्यांनी २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. अवघ्या २३व्या वर्षी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली.
Next: नाकात नथनी कानात झुमका केसामधी गजरा; मराठमोळी नेसून साडी भारी तुझा नखरा...