Maharashtra Rain Updates Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : मेघगर्जनेसह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढील ४ दिवस राज्यात कोसळधार, पाहा कोणत्या जिल्ह्यांना दिला अलर्ट

Marathwada and Vidarbha weather heavy rain forecast : पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याचे अंदाज. धाराशिव, सोलापूरमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra heavy rainfall alert : विजा, मेघगर्जनेसह महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा अन् विदर्भात धो धो पावसाची शक्यता आहे. समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

मध्यरात्रीपासून धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धाराशिवमधील परांडा येथे नद्यांना पूर आलाय. तर सोलापूरमधील बार्शीमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे. जालन्यातही धारा, उमरी पाथरूड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेताला तलावाच स्वरूप, शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण असेल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पुढील चार दिवस कोणत्या ठिकाणी पाऊस पडू शकतो.

३०० जण अडकले -

धाराशिवमध्ये मध्यराञी झालेल्या अतिवृष्टीने मोठा कहर केला आहे.धाराशिव,उमरगा,लोहारा,तुळजापूर, परंडा, भुम,कळंब, वाशी सह सर्वच तालुक्यात पावसाने तुफान बॅटींग केलीय.परंडा व भुम तालुक्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुराचा लाखी गावाला वेडा पडला आहे. तर सिरसाव गावात देखील घरात पाणी घुसले आहे.तसेच २०० ते ३०० नागरीक नदीच्या पलीकडे अडकले आहेत.चिंचपुर,बेलगाव येथील नद्यांना देखील पुर आला आहे.या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह द्राक्ष बागा व जनावरांच देखील मोठ नुकसान झाल आहे.पुराच्या पाण्यात गाई,म्हैस,शेळ्या अशी पाळीव जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे.

पुढील ४ दिवस राज्यात कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट, पाहा यादी

२२ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट -

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट, सातारा, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

२३ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट -

धुळे, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट, सातारा, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

२४ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट -

सोलापूर, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

२५ सप्टेंबर २०२५

यलो अलर्ट -

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया,

उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI Live सामन्यात प्रेमाचा राडा, तरूणीनं तरूणाच्या कानाखाली जाळ काढला, नेमकं झालं काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Elphinstone Bridge : 59 कोटींचा अडथळा, एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम रखडणार | VIDEO

Alibaug Tourism : दिवाळी अन् किल्ल्यावर भटकंती, अलिबागजवळ वसलंय प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण

PM Kisan Yojana: ३१ लाख शेतकर्‍यांचा पत्ता कट, 'पीएम किसान'च्या पडताळणीनंतर कारण आलं समोर; तुमचं नाव तर नाही ना?

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

SCROLL FOR NEXT