Maharashtra: मुसळाधार पावसाची शक्यता; 8 जिल्ह्यांना अलर्ट Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra: मुसळाधार पावसाची शक्यता; 8 जिल्ह्यांना अलर्ट

बंगालच्या उपसागरातून उदयास आलेल्या गुलाब चक्रीवादळाने आता कहरच केला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बंगालच्या Bengal उपसागरातून उदयास आलेल्या गुलाब चक्रीवादळाने आता कहरच केला आहे. हा वादळ लोकांचा जीव घेत आहे. गुलाब चक्रीवादळाने Cyclone Gulab महाराष्ट्रातील लोकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. सलग २ दिवस झाले आहे. आणि पावसाने महाराष्ट्रात कहरच निर्माण केला आहे. नद्या कहर करत आहेत. रस्ते आणि वस्त्यांना पूर आला आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती देखील बिकट आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरामुळे २०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद, महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. रस्त्यांवर पाणी नदीसारखे वाहत आहे. काल महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्राच्या लातूरमध्ये मंगळवारी जोरदार पाऊसाला सुरवात झाली. यामुळे सखल भाग आणि नदीच्या काठावर असलेली गावे जलमय झाली आहेत.

यानंतर, लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ टीम, हेलिकॉप्टर आणि बोटी तैनात कराव्या लागल्या आहेत. मागील २ दिवसात महाराष्ट्रात पावसाशी संबंधित घटनांमध्ये अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. याचवेळी एनडीआरएफने राज्यातील ५६० लोकांची सुटका केली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मधील अनेक दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सततच्या पावसामुळे नाशिक, पुणे, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. तसेच आज उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, हवामान विभागाने बुधवारी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात, पालघर, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT