Today Maharashtra Weather Update News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: सूर्य आग ओकतोय! विदर्भातील तापमान ४० अंशापार, राज्यात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Heat Wave: राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. उकाडा प्रचंड वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील तापमान ४० अंशापार गेले आहेत. त्यामुळे विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील तापमान ४० अंशांपार गेले

  • अकोला, अमरावती आणि वर्धा येथे सर्वाधिक तापमान नोंदले गेले

  • हवामान खात्याने या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला

  • पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज

मार्च महिन्याला सुरूवात होताच उष्णता वाढू लागली आहे. आतापासूनच उकाडा जाणवू लागला आहे. सूर्य आग ओकण्यास सुरूवात झाली असून विदर्भ तापायला लागला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि विदर्भातील तापमान ४० अंशापार गेले आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील तापमान चाळीशीपार गेल्यामुळे उष्णतेची लाट आली असे म्हटले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान खात्याकडून आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धामध्ये तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४०.८ अंश तापमान झाले आहे. अकोला पाठोपाठ अमरावतीमध्ये ४०.६ तर वर्धा जिल्ह्यात ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या अनेक जिल्ह्यात पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, असे आवाहन केले जात आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेची शक्यता असल्याने हवामान खात्याने या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ४० अंशांपार गेल्यास आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे म्हटले जाते.

शनिवारी अमरावतीसह अकोला आणि वर्धा येथील तापमान चाळी अंशापार गेले होते. याठिकाणी उष्णतेची लाट आली होती. तर सोलापूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली होती. तर निफाड येथे राज्यातील सर्वात निचांकी तापमान ११.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान? (कमाल तापमान)

पुणे (लोहगाव): ३८.५

जळगाव: ३८.५

कोल्हापूर: ३०.७

महाबळेश्वर: ३००.७

मालेगाव: ३८.१

नाशिक: ३७

सांगली: ३८.३

सोलापूर: ३९.६

छत्रपती संभाजीनगर: ३८.२

परभणी: ३८.१

धाराशिव: ३७

अकोला: ४०.८

अमरावती: ४०.६

बुलढाणा: ३७.२

गोंदिया: ३६.६

नागपूर: ३७.८

वाशिम: ३९.२

वर्धा: ४०

यवतमाळ: ३८.४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT