महाराष्ट्र

Wardha Heat Wave: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अंगणवाडी,प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी

Wardha School Close: वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढता तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो, यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Bharat Jadhav
  • महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा

  • वर्धा जिल्ह्यात शाळा आणि अंगणवाडींना सुट्टी

  • अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात तापमानाचा पारा वाढला असून अकोला शहरात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. मात्र 17 एप्रिल हा दिवस एप्रिल महिन्यातील सगळ्यात उष्ण दिवस असण्याची शक्यता आहे. अर्ध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवमान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. उद्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार वर्धा जिल्ह्यास यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मागील दोन दिवसापासून वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 16/04/2026 रोजी वर्धा जिल्ह्याचे तापमान 43-45°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सदर परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. उष्म लाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील विद्यार्थाना दिनांक 16/04/2026 रोजी सुट्टी असणे आवश्यक असल्याचं आदेश म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT