Heat Stroke Death Akola Saam tv
महाराष्ट्र

Heat Stroke Death Akola: सावधान! सूर्य आग ओकतोय; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी?

Akola Heat Stroke Death: मृत व्यक्तीकडे शासकीय रुग्णालयाची चिट्ठी सापडली. त्यात लूज मोशन, मळमळ होऊनं उलटी होणे, चक्कर येणे असा मोहनला त्रास असल्याचे नमूद आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, ता. २६ मे २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान 40 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान 45 अंश सेल्यियसवर पोहचले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास जाणवत असून अकोल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अकोला शहरामधील राणी सती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. मोहन गजानन खाडे (वय, ५०) असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे सापडलेल्या रुग्णालयाच्या चिठ्ठीमुळे त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत व्यक्तीकडे शासकीय रुग्णालयाची चिट्ठी सापडली. त्यात लूज मोशन, मळमळ होऊनं उलटी होणे, चक्कर येणे असा मोहनला त्रास असल्याचे नमूद आहे.

त्यामुळ त्याचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे मोहन खाडे गेल्या अनेक दिवसापासून घराबाहेर आहे, आणि रस्त्यावरच राहून उदरनिर्वाह करायचा मिळेल त्या जागेवर झोपायचा. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय हा मृत्यू उष्माघाताने झाला असे म्हणता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्याचे तापमान सध्या गेल्या 4 दिवसांपासून 45 अंशापार पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कलम144 लागू करण्यात आले आहे. म्हणून नागरिकांनी उन्हापासून बचावाकरिता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT