Heat Wave
Heat Wave Saam Tv
महाराष्ट्र

Weather Forecast: राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट कायम; 'या' जिल्ह्यांना IMDचा हाय अलर्ट!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: गेल्या काही दिवसांत हवेच्या बदलामुळे महाराष्ट्रासह देशाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. (Temperature Update In Maharashtra) देशातील अनेक शहरात उन्हाचा पारा वाढला असून गरमीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात तर सूर्य अधिकच तापत आहे. राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. काल चंद्रपूर याठिकाणी देशातील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवला गेला आहे.

दरम्यान, अनेकांना उष्माघाताच्या समस्या देखील जाणवल्या आहेत. महाराष्ट्राच्या यंदाच्या उष्माघाताचा आज अकोल्यात पहिला बळी गेला आहे, तसेच जळगावात सुद्धा एक शेतकरी उष्माघाताचा पहिला बळी ठरला होता. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यासाठी हवामान खात्याने (IMD) आज अहमदनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. राज्यात या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून येथील तापमान उष्ण होते. रहिवासी नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास होत आहे. एवढेच नाही तर उद्यासुद्धा राज्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान खात्याकडून उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मागील आठवड्याभरापासून उष्णेतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. परंतु आजपासून सलग चार दिवस राज्यातील विविध भागात उष्णतेच्या लाट येणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदण्याची शक्यता आहे.

त्यानंतर येत्या काही दिवसात एप्रिलपासून राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. शनिवारनंत राज्यात अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात घट होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : शरद पवार-ठाकरेंना पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी, इचलकरंजीतल्या सभेत अनेक जण धडपडले; VIDEO

Sudhir Mungantiwar News | '10 जून पर्यंत वाघनखं महाराष्ट्रात येणार' मंत्री मुनंगंटीवार यांची माहिती

Today's Marathi News Live : ​महाविकास आघाडीच्या इचलकरंजीतल्या सभेत चेंगराचेंगरी

Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

Rahul Gandhi News | महायुतीच्या प्रचार सभेत राहुल गांधींचा जयघोष

SCROLL FOR NEXT