Akola Heat Wave Alert Saam Digital
महाराष्ट्र

Akola Weather: अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद; १४ मे पासून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

Akola Temperature Alert: अकोल्यात आज 45.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीचं तापमानही 30 अंश सेल्सिअस पर्यंत जात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान हवामान खात्याने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Sandeep Gawade

अकोल्यात आज दुसऱ्याही दिवशी 45 अंशावर तपमानाचा पारा कायम होता. आज शुक्रवारी अकोल्यात 45.8 अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात अनेक भागात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असताना काल गुरुवारी अकोल्यात सर्वाधिक 45.5 अंश तापमानाची नोंद झाली होती. तर अकोल्याचे रात्रीचे तापमानही 30 अंश सेल्सिअस होते. हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक असून याआधी मे महिन्यातच सन 2022 मध्ये 45.8 आणि सन 2016, सन 2017 व सन 2018 मध्ये 45 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले होते. आजही अकोल्यात 45.08 अंश एवढी तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यानं मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होऊ लागली. तिन दिवसांपासून मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आज सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणू लागल्या. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ काहिशी मंदावली होती. तर संध्याकाळी काहीशी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अकोल्याचा तापमानाचा हा वाढता पारा कमी होऊन नागरिकांना सायंकाळी थोडाफार दिलासा मिळाला. मात्र दिवसभर उन्हाचा तडाखा राहत असल्याने तीव्र उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभाग सातत्यानं करत आहे.

१४ मे पासून पारा वाढताच

14 मे रोजी 41.08

15 मे रोजी : 40.09

16 मे रोजी : 42.04

17 मे रोजी : 40.02

18 मे रोजी : 42.00

19 मे रोजी : 43.02

20 मे रोजी : 43.08

21 मे रोजी : 43.08

22 मे रोजी : 44.08

23 मे रोजी : 45.05

24 मे सर्वाधिक 45.08

संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कवली गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील तापमान प्रचंड वाढले आहे. याचा नागरिकांना त्रास होताना दिसत आहे. मृत शेतकरी शेता गेला होता तिथून परत घरी येताच उष्मा घाताने त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांचे सरकारवर टीकास्त्र

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT