Raigad Irshalgad Viral Photo Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Irshalgad Viral Photo: इर्शाळवाडीतील मावशीच्या कृतीनं डोळ्यांत टचकन पाणी आलं; मृत गायीच्या पायाशी माथा ठेवून रडल्या...

Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updates: इर्शाळवाडीतील मावशीच्या कृतीनं डोळ्यांत टचकन पाणी आलं; मृत गायीच्या पायाशी माथा ठेवून रडल्या...

साम टिव्ही ब्युरो

>> सतीश बाटे

Raigad Irshalgad Viral Photo: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत अनेकांनी आपली जिवाभावाची माणसं गमावली आहे. पण या दुर्घटनेत फक्त जीवितहानीच नाही, तर अनेक पशुंचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत राघी पारखी या मावशींच्या गायीचा मृत्यू झाला आहे.

ही मृत गाय तिथेच पडून असताना या मावशीने त्या गायीचे दर्शन घेतलं आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायीला हिंदू धर्मात माता मानतात. अनेकजण पशूंना आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य मानतात, मायेनं जिवाभावाची त्यांचं सारं काही करतात.

उदरनिर्वाहासाठीही यांचा वापर केला जातो. त्यांचं असं निघून जाण्याचं दुःख हे जवळची व्यक्ती निघून जाण्या इतकंच असतं. व्हायरल फोटोत या मावशींनी केलेल्या कृत्याने प्रत्येकाचं मन हेलावून गेलं आहे.

इर्शाळवाडी दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद, बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा

इर्शाळवाडी ठाकुरवाडी दरडग्रस्त ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमत आहे. यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर इर्शाळवाडी ठाकुरवाडी दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. (Latest Marathi News)

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; बचावकार्यासाठी व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी

खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहचला आहे. बचाव पथकाकडून आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर येथे बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे २१ जवान बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी पोहचलेले आहेत. मातीच्या ढिगाऱ्या खाली सापडलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा काम व्हाईट आर्मीचे जवान करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT