Tragic end to a love story in Nagpur: After Ankita Khobragade's suicide, boyfriend Anurag Meshram attempted to end his life by jumping onto her funeral pyre. Locals intervened and rushed him to a hospital. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Nagpur : नागपूरकर सुन्न! गर्लफ्रेंडनं गळफास घेत आयुष्य संपवलं, तिच्याच सरणावर जाणाऱ्या बॉयफ्रेंडला लोकांनी चोपला

Tragic end to a love story in Nagpur : नागपूरच्या कन्हान येथे अंकिता खोब्रागडे हिने आत्महत्या केल्यानंतर तिच्या प्रियकराने अंत्यसंस्कारावेळी सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुराग मेश्रामला नातेवाईकांनी रोखत रुग्णालयात दाखल केले.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Ankita Khobragade suicide case: boyfriend attempts suicide during cremation : नागपूरच्या कन्हान नदीकाठच्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच सुन्न केलं. प्रेमाच्या या कहाणीत अंकिता खोब्रागडेच्या आत्महत्येने प्रियकर अनुराग मेश्रामच्या आयुष्याला कायमचा कलाटणी दिली. रविवारी सायंकाळी अंकिताने गळफास घेऊन जीवन संपवलं, पण तिच्या चिठ्ठीत अनुरागला निर्दोष ठरवत त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. अंत्यसंस्कारावेळी अनुरागने सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाइकांनी त्याला रोखत मारहाण केली. आता खाजगी रुग्णालयात उपचार घेणारा अनुराग मृत्यूशी झुंजतोय. त्याच्यावर नागपूरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर जिल्ह्याच्या कन्हान येथील १९ वर्षीय अंकिताने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी शवविच्छेदनानंतर अंकितावर अंत्यसंस्कार सुरू होता. एवढ्यातच अनुराग मेश्राम या तरुणाने तिच्या सरणावर जाऊन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी अनुराग मेश्रामला चांगलाच चोपला. अनुराग सध्या कामठी परिसरात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. अंकिताने चिठ्ठीत अनुरागला दोषमुक्त ठरवले होते. ही प्रेमकथा हृदय पिळवटून टाकणारी असून नागपूरकर सुन्न झाले आहेत.

अंकिता आणि अनुराग हे एकाच गावातील असून त्यांच्या दोघांमध्ये मैत्री होती. या मैत्रीची वाट पुढे अडसर असल्यानं अंकिताने राहत्या घरी रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. यामध्ये अंकिताने लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये माझ्या मृत्यूसाठी अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये. अनुरागला काहीही करू नये असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास अंकिताच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिच्यावर अंत्यविधी पार पाडत असताना अचानक अनुराग मेश्राम हा तिथे पोहोचला. त्याने सरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असल्याने. यावेळी या कृत्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले संतापले. अनुरागला बाजूला करत चांगला चोपला. घटनेच्या माहिती नंतर अनुरागच्या वडील आणि भावानी त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. सरणावर उडी घेत असताना त्याने कुठलेतरी द्रव्य प्राशन केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय अहवालानंतरच या सगळ्या बाबीचा खुलासा होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. नागपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT