चाललंय काय? राज्यात महिला आणि मुलांच्या आरोग्याशी खेळ, पोषण आहारात आढळले किडे-अळ्या
Nanded  Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : चाललंय काय? राज्यात महिला आणि मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु, पोषण आहारात आढळले किडे-अळ्या

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी

नांदेड : पुण्यानंतर आता नांदेडमध्ये पोषण आहाराविषयी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून गरोदर माता आणि लहान मुलांसाठी पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे आणि अळ्या आढळल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण निर्माण झाली आहे.

पुण्यातील जनता वसाहतीमधील पान आळीत एका अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात उंदाराची विष्ठा आणि अळ्या आढळल्याची घटना रविवारी समोर आली. त्यानंतर आता नांदेडच्या किनवट तालुक्यात राज्य शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे आणि अळ्या आढळल्याची घटना घडली. या प्रकारानंतर नागरिकामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच आरोग्याविषयी चिंता करू लागले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

नांदेडमध्येही गरोदर माता आणि लहान मुलांना राज्य शासनाकडून पोषण आहार पुरवला जातो. या पोषण आहाराच्या बाबतीत अनेक ठिकाणी तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर नांदेडच्या किनवट तालुक्यातील आप्पारापेठ पोषण आहारात किडे आणि अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा आप्पारपेठ परिसरातील पोषण आहार गरोदर माता आणि लहान मुलांना देण्यात आला होता.

या पोषण आहारातील पॉकेट उघडून पाहिले असल्यास त्यात किडे, अळ्या , दुर्गंधी सुटलेला आहार असल्याचे आढळून आले. हा संपूर्ण घटनेनंतर पालकांनी हा आहार अंगणवाडीत आणून फेकला. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहार आणि त्यात किडे, अळ्या निघाल्याने गरोदर माता आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने असा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देऊ नये, चांगल्या दर्जाचा पोषण आहार द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच पालकांनी या निकृष्ट पोषण आहाराविषयी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, पुण्याच्या खेडमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार समोर आळा होतात. पोषण आहारातील तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि अळ्या लागल्याचे समोर आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : बोगस आरपीएफ जवानाच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर; भरतीसाठी एकाने घेतले लाखो रुपये

Maratha Reservation: आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात! लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकटवणार; काय आहे नवी रणनिती? पाहा VIDEO

T20 World Cup: विजयानंतर टीम इंडियाच्या विजयाचं जंगी सेलिब्रेशन, हटके फोटो

Organic Butter Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा ऑर्गेनिक बटर

Mumbai Rain Alert : मुंबई-पुण्यासाठी पुढील 3-4 तास महत्वाचे; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT