आरोग्य विभाग  SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking : आरोग्य विभाग 'गट ड' परीक्षेचा पेपर फुटला!

अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली!

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे : आज झालेला आरोग्य विभागाचा गट -ड चा पेपर काल रात्रीच फुटला असल्याची तक्रार विद्यार्थी करताहेत, अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली, सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ होत आला, आजही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड ची भरती :

- राज्यातील सुमारे ४ लाख ३० हजार उमेदवारांनी भरले होते अर्ज

- भंडारा जिल्ह्यातील केंद्रावर २५० विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक देण्यात आले नाही, तिथे उशीर झाला

- मोहाडी सह काही केंद्रांवर सील नसलेल्या लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे.

न्यासाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका?

- लोहमार्ग पोलीस भरती, आरोग्य विभाग भरतीत न्यासा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले होते

- प्रशपत्रिका ठेवण्यासाठी कोषागार निश्चित करणे, सुरक्षा नेमण्यात न्यासा कुचकामी

- प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणे, सीलबंद पेट्या, सोबत सुरक्षा पुरविण्यात न्यासा कमी पडल्याचे या अधिच्या घटनांतून दिसले आहे.

- औरंगाबाद मध्ये प्रशपत्रिकेच्या झेरॉक्स विकल्या गेल्याचे उमेदवारांचे आरोप

- दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढीव वेळ मिळाला नाही

- नांदेड मधील एका महिला उमेदवाराला प्रवेशपत्रातील केंद्र वेगळे आणि प्रत्यक्ष बैठक व्यवस्था दुसऱ्या केंद्रावर!!!

या सर्व गंभीर प्रकारांनंतर विद्यार्थ्यांकडून आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT