IPL 2023 Harry Brook Century IPL 2023
महाराष्ट्र

Harry Brook Century: हैदराबादच्या हॅरी ब्रूकने झळकावलं यंदाच्या हंगामातलं पहिलं शतक! ईडन गार्डन्सवर धावांचा पाऊस

Chandrakant Jagtap

IPL 2023 Harry Brook Century: इंडियन प्रीमियर लीग 31 मार्चपासून सुरू झाली पण पहिले शतक झळकावायला 14 दिवस लागले. 18 सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर चाहत्यांना आयपीएलच्या 16 व्या आवृत्तीत पहिले शतक पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर हॅरी ब्रूकने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर शतक झळकावले.

कोलकाता विरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याने 55 चेंडूत 100 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकारही मारले. त्याच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाला 228 सारखी मोठी धावसंख्या गाठता आली.

सलामीवीर हॅरी ब्रुकचं दमदार शतक, त्याला कर्णधार एडम मार्करमने दिलेली 50 धावांची साथ आणि अखेरच्या काही षटकांत अभिषेक शर्मा आणि क्लासेनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरादावर सनराईज हैदराबादने कोलकातासमोर विजयासाठी 229 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.(IPL 2023)

या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावरप्लेमध्ये त्याचा हा निर्णय काही प्रमाणात गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठीला झटपट माघारी पाठवलं. मात्र, त्यानंतर हॅरी ब्रुकने एडम मार्करमच्या साथीने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Latest Sports News)

या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावरप्लेमध्ये त्याचा हा निर्णय काही प्रमाणात गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठीला झटपट माघारी पाठवलं. मात्र, त्यानंतर हॅरी ब्रुकने एडम मार्करमच्या साथीने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

हॅरी ब्रूकने मार्करमसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७२ धावांची भागिदारी केली. मार्करम २४ चेंडूत ५० धावा काढून बाद झाला. त्याने २ चौकार आणि ५ सणसणीत षटकार ठोकले. त्यानंतर अभिषेक शर्माने ब्रुकला चांगली साथ दिली.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग 11:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा.

सब्स्टिट्यूट्स: मनदीप सिंग, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11:

अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.

सब्स्टिट्यूट्स: अब्दुल समद, विव्रत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, वॉशिंग्टन सुंदर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : काल पर्यंत कडू होत...निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉस घरात नेमकं चाललंय काय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT