नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवताना सावधान
ऑनलाइन मेसेज पाठवताना होऊ शकतो फ्रॉड
अशा पद्धतीने घ्या काळजी
नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण व्हॉट्सअॅपवरुन, सोशल मीडियावरुन मेसेज पाठवतात. या मेसेजच्या माध्यमातून तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता आहे. मात्र, आज रात्रीपासूनच सायबर गुन्हे होण्याची शक्यता आहे. यामुळेच पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पालीच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तुम्ही जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा पाठवता. मात्र, यामुळे होणाऱ्या आर्थिक फसवणूकीपासून वाचा. सतर्क राहा आणि सुरक्षित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
काय फ्रॉड होऊ शकतो?
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला Happy New Year या नावाने एखादी APK File, PDF किंवा Document File येऊ शकते.
कोणत्याही नंबरवरुन आलेली ही अशी फाइल इन्स्टॉल किंवा ओपन करु नका. हा मेसेज कोणत्याही नंबरवरुन येऊ शकतो. याचाच अर्थ असा की, तुमचा मोबाईल आधीच हॅक झालेला असू शकतो.
जर तुम्ही ही APK फाइल ओपन केली तर तुमचा फोन हँग होतो आणि तुमच्या फोनचे नियंत्रण हॅकर्सकडे जाते. तुमच्या फोनवरुन हाच मेसेज, व्हायरल इतर ग्रुपवर पाठवला जाईल.
यानंतर फोन पे, गुगल पे, अॅमेझॉन यासारखे अॅपदेखील हॅक होती. यानंतर तुमच्या खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात. तुमचे पैसे डेबिट झाल्याचे मेसेजदेखील डिलिट करतात. यामुळे तुम्हाला काहीच कळत नाही.
ही काळजी घ्या
जर एपीके फाइल डाउनलोड करताना मोबाईल हँग झाला तर फोनचे नेट किंवा वायफार बंद करा. यानंतर संशयास्पद फाइल डिलिट करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.