सोन्याचे आमिष दाखवून लाखांची लूट करणाऱ्या टोळीला अटक Saam Tv
महाराष्ट्र

जादूटोण्यातून दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या भोंदूला बेड्या

जादु टोण्याचा चमत्कार करुन क्षणात दाम दुप्पट करुन देण्याच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाट्यावर साडे चार लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी संतोष साहेबराव देवकर व अशोक फकीरा चव्हाण (रा.थेऊर, पुणे) या भोंदूंना श्रीगोंदा पोलिसांनी जेलची हवा दाखवली आहे.

सचिन अगरवाल

अहमदनगर : जादु टोण्याचा चमत्कार करुन क्षणात दाम दुप्पट करुन देण्याच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाट्यावर साडे चार लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी संतोष साहेबराव देवकर व अशोक फकीरा चव्हाण (रा.थेऊर, पुणे) या भोंदूंना श्रीगोंदा पोलिसांनी जेलची हवा दाखवली आहे. हि घटना 13 ऑगस्ट ला संध्याकाळी घडली होती. पोलिसांनी या भोंदू बाबांकडून एक मोटारसायकल, दोन मोबाईल व ३ लाख ७५ हजाराची रोकड जप्त केली आहे.

हे देखील पहा -

दत्तात्रय महादेव शेटे (रा.करमाळा) हे शेतकरी असून कर्जबाजारी झाले होते. या भोंदूंना ओळखीच्या व्यक्तीकडून याबाबत समजले असता त्यांनी तुम्हाला क्षणात दाम दुप्पट करुन देतो. साडे चार लाखात नऊ लाख रुपये दुप्पट करून देण्याचे ठरले. यासाठी हिरडगाव फाट्यावरचे ठिकाण निश्चित करण्यात आले. दत्तात्रय शेटे यांनी दाम दुप्पट होणार या हव्यासाने त्यांच्याच एका मित्राकडून साडे चार लाख रुपये उसणे घेतले आणि दि. १३ ऑगस्टला हिरडगाव फाट्यावर पैसे, काळी बाहुली, तांदुळ, गुलाल व बुक्का घेऊन आले. त्यांनी गाडीच्या डिक्कीत पैसे व पेटी ठेवली होती.

आरोपी

हिरडगाव फाट्यावर भोंदूंनी गाडीच्या डिक्कीतील पैसे काढून घेतले व डिक्की लावली. घरी जाई पर्यंत डिक्कीतील पेटी उघडू नका अन्यथा पैसे दुप्पट होणार नाही. त्यामुळे शेटे यांनी करमाळ्याला जाई पर्यंत डिक्की उघडली नाही. घरी गेल्यावर पेटी उघडली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या टीम ने कौशल्याचा वापरुन थेऊर येथील एका मंदीरात लपलेल्या दोन्ही भोंदूंना अटक केली. अश्या भोंदूपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT