Solapur News, Solapur Water Supply saam tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापूरकरांनाे ! रविवारपासून पाणीपुरवठ्यात हाेणार कपात

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर शहारात पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. येत्या रविवारपासून (ता. 25 जून) शहराचा पाणीपुरवठा अर्ध्या तास कमी केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

सोलापूर जिल्ह्यात पावसाने हुलकवणी दिली आहे. उजनी धरणातील जलसाठा घटत चालला आहे. सोलापूरकरांना आता भीषण जल संकटाला सामोरे जावे लागणार आहे. येत्या रविवार पासून नागरिकांना पाणीपुरवठा अर्ध्या तासाने कमी होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी पंप हाऊस येथून दुबारा पंपिंगची तयारी केली आहे.

सोलापूर शहराची वरदायिनी असणारी उजनी धरण 30 टक्के वजा पातळी गाठली आहे. सोलापूर शहरातील अनेक भागात पाच ते आठ दिवसाड पाणीपुरवठा होतो. जलसाठात घट झाल्यामुळे महानगरपालिकेवर दुबारा पंपिंगची वेळ आली आहे. यातून सोलापूरकरांना अर्धा तास कमी पाणी दिले जाणार आहे. वेळेत पाऊस होण्याची गरज आहे. मात्र तसे न झाल्यास सोलापूरकरांवर पाण्याचे (water) संकट भीषण होण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT