Nitin Gadkari Saam Tv
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue: ...तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला नसता; नितीन गडकरींनी सांगितलं ते एक कारण

Nitin Gadkari Shivaji Maharaj Statue Rajkot Fort: भारतीय नौदलाच्या वतीने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात आला होता.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Nitin Gadkari On Shivaji Maharaj Statue Incident Rajkot: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा कोसळा नसता, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेय. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण त्याला गंज लागत नाही, असे स्पष्टीकरणही नितीन गडकरी यांनी यावर दिलेय. मंगळवारी ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. छत्रपतीचा पुतळा तयार करताना तज्ञ्जांचा सल्ला घेतला होता का? असा सवाल उपस्थित झालाय.

मालवण येथील राजटोक किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. याप्रकरणी करावाई करत शिल्पकार जयदीप आपटे यांच्यासह अनेकांना गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. याप्रकरणात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच नितीन गडकरींच्या वक्तव्य चर्चेत आले आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करताना स्टेनलेस स्टील वापरलं असते तर पुतळा कोसळला नसता, असे गडकरी यांनी म्हटले आहे. समुद्र किनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा.

समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे, असेही गडकरींनी सांगितले. समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही स्ट्रक्चरवर लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, "मुंबईमध्ये जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले होते, तेव्हा एका माणसासोबत फेरफटका मारताना उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडावर कोटींग पावडर निघून गेल्याचं दिसले होते. त्याला गंज चढला होता. त्यानंतरच्या काळात मुंबईतील सर्व पुलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा निर्णय घेतला." मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळ्याची उभारणी करताना स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा कोसळला नसता. कारण स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, असे देखील गडकरी यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT