23-year-old Nagpur youth hospitalized after suffering paralysis due to excessive gym workout and stress. saam tv
महाराष्ट्र

जीमचा नाद, जीवन बरबाद? अतिव्यायाम केला, तरुणाच्या अंगलट आला

Excessive Gym Workout Paralysis Case In Nagpur: नागपूरमध्ये 23 वर्षीय तरुणाला अतिव्यायामामुळे पॅरालिसिसचा झटका आला. अभ्यासाचा ताण आणि जास्त व्यायामामुळे मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलं. वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचला.

Bharat Mohalkar

हा अंथरुणाला खिळलेला आहे 23 वर्षीय ओम भोयर हा तरुण... कारण बॉडी बनवण्याचा नाद या तरुणाच्या अंगलट आलाय....ऐन परीक्षेच्या काळात रात्रभर जागरण, अभ्यासाचा ताण असतानाही जीममध्ये वजन उचलण्याच्या चुकीमुळे जीवन बरबाद होता होता वाचलं.. कारण या 23 वर्षीय तरुणाला अतिव्यायाम केल्यानं पॅरालिसिसचा झटका आला...मात्र त्याची आई नर्स असल्यानं तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं...आणि मोठा धोका टळला...

खरं तर अभ्यासाचा ताण, रात्ररात्र जागरण, अतिप्रमाणात व्यायाम यामुळे मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचं आढळून आलं.. तर डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यानं तरुणाचा जीव वाचला... त्यामुळेच डॉक्टरांनी जीममध्ये जाणाऱ्या तरुणांना ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच जीम करण्याचा सल्ला दिलाय..

खरं तर अनेकदा तरुणांना जीममध्ये चक्कर येणं, हार्ट अटॅक येण्याचे प्रकार घडत आहेत.. तसाच प्रकार नागपूरमध्ये घडला.. मात्र तरुणाच्या आईनं वेळेत रुग्णालयात दाखल केल्यानं तरुणाचा जीव वाचला... यातून जीमला जाणाऱ्या तरुणांनी धडा घेण्याची गरज आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT