Crime
Crime  SaamTvNews
महाराष्ट्र

शेगावात गुटखा जप्त; दोघांना अटक

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अवैध गुटखा विक्री सर्रास सुरु आहे. याबाबत खामगाव येथील अप्पर पोलीस (Police) अधिक्षक यांचे पथकाला माहिती मिळाल्यावरून त्यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील श्री अग्रसेन चौकातील प्रितम ट्रेडर्स येथे धाड टाकून विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व साहित्य असा एकूण ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. प्रितम कमलकिशोर टिवडेवाल आणि सौरभ कमलकिशोर टिबडेवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे देखील पहा :

शेगाव (Shegaon) येथील अप्पर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस यांचे पथकाला माहिती खबऱ्याने खात्रीलायक दिलेल्या माहिती वरून रात्री च्या सुमारास शहरातील श्री अग्रसेन चौकातील प्रितम ट्रेडर्स येथे धाड टाकली असता तेथे प्रितम कमलकिशोर टिवडेवाल आणि सौरभ कमलकिशोर टिवडेवाल हे दोन्ही भाऊ आपल्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक आणि जिवीतास हानिकारक असा गुटखा विक्री करीत असताना दिसून आले.

यावरून दुकानाची (Shop) झडती घेऊन प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसाला, केसर युक्त विमल पान मसाला, प्रीमियम एक्स एल जाफरानी जर्दा, केसर युक्त विमल पान मसाला, करमचंद प्रोमियम, KC 1000 जाफरानी जर्दा असे प्रतिबंधित असलेले विविध कंपन्यांचा गुटखा (Gutkha) साठा आणि साहित्य असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT