Solapur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

पाेलीसांची माेठी कारवाई; पुण्याला निघालेल्या २ कंटेनरसह पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त

दोघांच्या सांगण्यात गफलत झाल्याने पाेलीसांनी कंटेनरची पाहणी केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कर्नाटकातून (karnataka) आलेला बेकायदा गुटखा (gutkha) पुण्याकडे (pune) जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे पकडण्यात आला. तालुका पोलिसांनी (solapur police) कंटेनरसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंडीराम पवार आणि इस्माईल शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (solapur latest marathi news)

हा कंटनेर गुलबर्गा येथून तुळजापूरच्या (tuljapur) दिशेने जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून मंद्रुपकडून येणाऱ्या दोन्ही कंटेनरचा पाठलाग करण्यात आला. दोन्ही कंटेनर यांना कोंडी येथील पाकणीजवळ थांबविण्यात आले. कंटेनरमधील चालकाकडे विचारणा केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

दोघांच्या सांगण्यात गफलत झाल्याने पाेलीसांनी कंटेनरची पाहणी केली. आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गुटखासदृश माल भरलेला असल्याचे पाेलीसांना दिसून आले. दोन्ही कंटेनर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे नेऊन पाहणी केली असता, त्यात गुटखा, सुगंधी तंबाखूची ८०० पोती आढळून आली. याबाबत पाेलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (satyasai kartik) म्हणाले हा माल सुमारे एक कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा आहे आणि ४५ लाखाचे दोन कंटेनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण, मुंब्रातून एकाला अटक

Valentine Day Love Story: प्रेमपत्र! नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं

Quick easy tilgul recipe: मकर संक्रांतीसाठी घरीच बनवा झटपट तीळगूळ, वाचा सोपी पद्धत

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, वडील दूध विकायचे, लेकीने एकदा नव्हे तर दोनदा केली क्रॅक; IAS अनुराधा पाल यांचा प्रवास

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

SCROLL FOR NEXT