Guru Purnima 2022, Shegoan saam tv
महाराष्ट्र

Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भातील पंढरी शेगांव संंस्थानात भाविकांची गर्दी

आज राज्यभरात गुरुपाेर्णिमा माेठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

संजय जाधव

बुलढाणा : गुरुपाेर्णिमा (guru purnima 2022) निमित्त संतनगरी शेगाव (shegoan) येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक तसेच नागरिक (citizens) माेठ्या संख्येने आले आहेत. यामुळे मंदिराच्या (temple) परिसरामध्ये भक्तांची गर्दी झाली आहे. (guru purnima latest marathi news)

बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील संत गजानन महाराज यांचे शेगाव या गावाची ओळख विदर्भातील पंढरी म्हणून आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आपली इच्छा बाबांकडे प्रकट करतात. गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेणयासाठी भाविक शेगावला येत असतात. आजही येथे माेठ्या संख्येने भाविक आले आहेत.

यामुळे संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमाच्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून शेगावात दाखल हाेऊ लागल्या आहेत. या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भर पावसात शेगावात भाविकांनी मंदिराच्या बाहेर गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रांग लावली आहे. आज सकाळी आरती झाल्यानंतर अनेक जण आपआपल्या गावी परतू लागले आहेत. एकंदरीतच गुरुपाेर्णिमा निमित्त आज शेगावात उत्साहाचे वातारवण आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT