Gunratna Sadavarte  SaamTvnews
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte On Supreme Court : SC, ST आरक्षणाबाबतचा निकाल चुकीचाच ; गुणरत्न सदावर्तेंचं सुप्रीम कोर्टाच्या निकालालाच आव्हान

Gunratna Sadavarte On SC ST Reservation : अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास मान्यता देणारा महत्त्वाचा निकाल गुरुवाही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असल्याचं म्हणत, गुणरत्न सदावर्तें यांनी आव्हान दिलं आहे.

Sandeep Gawade

SC, ST आरक्षणाबाबतसर्वोच्च न्यायालयालयाने दिलेला निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आहे. तसेच राज्यातील आगामी निवडणूकांवर प्रभाव टाकणारा असल्यामुळे हा निकाल चुकीचा आहे, असं म्हणत गुणरत्न सदावर्तें यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालालाच आव्हान दिलं आहे या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी ६ विरुद्ध १ अशा बहुमताने हा सर्वात मोठा निकाल दिला होता. या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि जमातीतील वर्गीकरण राज्य सरकारला करता येणार आहे.

एससी-एसटी आरक्षणाचे उप-वर्गीकरण राज्यांना करण्याची परवानगी देता येईल का ? यावर सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. फेब्रुवारी महिन्यात कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. गुरुवारी याबाबत कोर्टाने निकाल दिला. त्यामुळे अत्यंत मागास असलेल्यांसाठी याच प्रवर्गातील राखीव जागांचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे SC, ST मधील अतिमागासलेल्यांसाठी आरक्षित कोट्यातच वेगळा कोटा निर्णाण होणार आहे. अतिमागासलेल्या जाती-जमातींना निर्णयाचा लाभ होणार मिळणार आहे. आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना इम्पेरिकल डेटा गोळा करून न्याय देता येईल.सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येणार आहे.

याच आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 2004 ला निर्णय दिला होता. दरम्यान आता न्यायालयीाने आपल्या स्वतःच्या निर्णयाची समीक्षा करत अतिमागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रवर्गातच राखीव जागांचा मार्ग मोकळा केलाय. त्यावर आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयालयाने दिलेला हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आहे. तसेच राज्यातील आगामी निवडणूकांवर प्रभाव टाकणारा असल्यामुळे हा निकाल चुकीचा आहे. असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT