Arrest to Manoj Jarange Patil lawyer Gunaratna Sadavarte letter to Home Secretary Saam TV
महाराष्ट्र

Gunratna Sadavrte News: 'मराठा आरक्षणास विरोध; जरांगेंच्या सभेपेक्षा यात्रा मोठ्या...' गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचले!

Gunratna Sadavrte On Manoj Jarange Patil: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे." असेही वकिल सदावर्ते यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Maratha Reservation News:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी चांगलेच रान पेटवले आहे. आज जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. राज्यभरातील मराठाब बांधव लाखोंच्या संख्येने या सभेला हजर होते. या सभेतून जरांगे पाटील यांनी १० दिवसांत सरकारला आरक्षण जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या मागणीनंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

"जरांगेच्या (Manoj Jarange Patil) सभेला मी यात्रेसारखे पाहतो. लोक येतात मौज मजा करून जातात, त्यांची भाषा शिवराळ आहे. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, अशी टीका वकिल गुणरत्न सदावर्तेंनी केली. तसेच शरद पवार उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे." असेही वकिल सदावर्ते यावेळी म्हणाले.

"मराठा समाज मागास नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. मागे दिलेले आरक्षण नाकारलं. आता बिनबुडाच्या गोष्टी करत आहेत ओबीसीतून आरक्षण द्या म्हणतात, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) हे जरांगेचे बॉस आहेत. शरद पवार जसं बोलतात तसं ते करतात. शरद पवारांच्या भूमिकेवर जरांगे बोलतात.." असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जरांगे पाटलांनी केला हल्लाबोल....

दरम्यान, आजच्या अंतरवाली सराटीमधील विराट सभेतून जरांगे पाटलांनी वकील गुणरत्न सदावर्तेंवर ( Gunratna Sadavrte) जोरदार हल्लाबोल केला. भाऊ तुला एकदा सुट्टी दिली मराठ्यांनी. तू मराठ्यांचं वाटोळं केलं आहे. मराठ्यांच्याविरोधात तुच कोर्टात गेला आहेस. मराठ्यांविरोधात आग ओकणं कमी करा,असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; 5 आरोपींना मुंबई गुन्हे शाखा उद्या कोर्टात हजर करणार

Thursday Horoscope: धनलाभाचे योग अन् नात्यांत गोडवा; या ४ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले? जरांगे आरोपांचे पुरावे देणार?

शूटर १५ तासांत जेरबंद पण मास्टरमाइंड कोण? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT